एका ओळीची कविता…

काल जरा अवचितच घडलं
तळ्याकाठी ‘ती’ अचानक भेटली
थोडी बावरली मग सावरली
खोटं खोटंच हसली…

मग परत मुकी झाली
तलावाच्या काठी पुन्हा हरवली
अचानक उठणाऱ्या जलतरंगा सारखी
पुन्हा भरभरून बोलली…

सुर्य मावळतीला आला
आकाशा पाठोपाठ तलाव ही
लाजुन लालबुंद झाला
संध्या मग खुलून आली…

आणि मग तिने शेवटी
एक विचीत्र अट घातली…

तिच्या माझ्या प्रेमाची…
वेळेला शब्दात बांधन्याची…
आठवणींच्या शिदोऱ्याची…

फक्त आणि फक्त
एका ओळीच्या कवितेची…

© PlanetAlkeshA™ 🦂