À

शब्दां वाचून

दुर कुठेतरी क्षितीजाच्या पलीकडे बघताना, नजरेच्या अगदी जवळ एक ओळ उडी मारून जाते. एकच ओळ. तिच्या गर्भात गहन अर्थ आहेत. तिच्या हातावर जाणिवांचे अनेक गहिरे रंग गर्दी करून आहेत. ती ओळ जी तुम्हाला जगाचा नवा अर्थ देऊन जाऊ शकते. ती ओळ तुम्हाला सांगायची आहे. व्यक्त करायची आहे. त्या ओळीचे जे अर्थ, रंग, गंध तुम्हाला जाणवले आहेत ते जगाला किंवा त्यातल्या काही ठराविक लोकांना सांगायचे आहेत, व्यक्त व्हायचं आहे. तुम्ही ज्या नदीत आकंठ बुडून आलात त्या नदीचं रूप तुम्हाला इतरांना सांगायचं आहे अशी ती ओळ. त्या ओळींमध्ये त्या क्षणाला जगाचं, जीविताचं सार आहे अशी ती ओळ.

ती ओळ तुम्हाला सांगायची आहे. पण नुसती एक ओळ कशी सांगू? नुसती एक ओळ कशी लिहू? लोक चुकीचे अर्थ घेतात म्हणून नव्हे पण तुम्हाला त्यावर बोलायचं आहे म्हणून ती एक ओळ हि एकच ओळ म्हणून लिहिता येत नाही. मग शोध सुरु होतो संदर्भांचा. कुठेतरी केंव्हातरी घडलेल्या घटना, तुमच्या आयुष्यातले प्रसंग यांची रीघ मनात लागते. जो…

View original post 328 more words