परफेक्ट चहा!

BLOG OF PARIKSHIT

नुसता विचार करून काहीही होत नाही. मनाशी रचलेल्या गोड गोष्टी जगात चालत नाहीत. तिकडे नुसते वास्तवाचे चटके असतात.

म्हणजे पहिल्यांदा आपण चहा करतो. फार कौतुक असतं आपल्याला स्वतःचं. मग आपण तो कपात ओतून घाईघाईत पहिला घोट घ्यायला जातो आणि जीभ भाजते.

आयुष्यात हेच होत असतं. उत्साह, काहीतरी केल्याचं कौतुक डोक्यात घेऊन आपण सुखाची चव घ्यायला जातो आणि वास्तव नावाच्या उष्माने आपली जीभ भाजते.

किती तरी उमेदीने आपण केलेल्या पहिल्या वहिल्या चहाची चव घेऊ बघत असतो. पण नाही होत शक्य. जीभ भाजली की चहाची खरी चव आपल्याला समजत नाहीच. आपल्याला कळतच नाही चहा जमलाय की बिघडलाय.

मग पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेस वास्तवाला आपण फुंकर मारून आपल्याला जीभेला जमेल इतकं साजेसं करतो. चव घेतो. वाटतं साखर कमी झाली आहे. ठीक आहे पुढच्यावेळी पुन्हा प्रयत्न करूयात‌ म्हणत स्वतःबद्दल अपेक्षा ठेवतो. मग काही तरी चहा पावडरच कमी होते तर कधी तो जास्तच आटला जातो.

असं चालूच राहतं. आयुष्यातला परफेक्ट चहा बनेपर्यंत!

पण परफेक्ट चहा…

View original post 108 more words